करमाळा प्रतिनिधी
शेलगाव क, ता. करमाळा येथे ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने दि. 11 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर 12 ऑगस्ट रोजी कुस्ती आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ 260 लाभार्थ्यांनी घेतला. त्यामध्ये 40 वर्ष वयोगटाच्या पुढील 178 रुग्णांचे डोळे तपासून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. ज्या रुग्णांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी ऑपरेशन ची तारीख देण्यात आली. याप्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
हे आरोग्य शिबिर मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल करमाळा यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एच. व्ही. देसाई नेत्र रूग्णालय, महंमदवाडी, हडपसर, पुणे,सुविधा हॉस्पिटल बार्शी,सुश्रुत हॉस्पिटल बार्शी,उपजिल्हा रूग्णालय, करमाळा व मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल करमाळा डॉ. ओंकार उघडे यांनी सहभाग घेतला. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रदीप बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…