Categories: Uncategorized

शंभुराजे जयवंतराव जगताप यांना बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा खरेदी विक्री संघाचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शंभुराजे जयवंतराव जगताप यांना बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.युवा नेते शंभुराजे जगताप हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र आहेत. २९ मार्च २०२५ रोजी मौजे बोरगाव येथे अक्षय विठ्ठल शिंदे यांच्यासह काहीजण सीना नदीपात्रातून वाळू नेत असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी शं. यावेळी शंभुराजे जगताप व इतर दोघांनी पोलिसांना ही कारवाई करण्यास विरोध केला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिस कॉन्स्टेबल अमोल शाहीजी रांदील यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर श्री. जगताप हे ५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते.
त्यानंतर त्यांनी ॲड. भारत कट्टे यांच्या मार्फत बार्शी येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर आज (दि.१४ ऑगस्ट) त्यांना जामीन मंजूर केला आहे.यात जगताप यांच्यावतीने ॲड. भारत कट्टे, ॲड. नवनाथ राखुंडे (करमाळा) व ॲड. गणेश जगताप (बार्शी) यांनी काम पाहिले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago