गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लब गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी निवडी संपन्न.


करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे गणेशोत्सव मीटिंग पार पडली. सदर मीटिंगमध्ये अध्यक्षपदी संतोष वैंगलम यांची सर्वानुमते निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी अमित कांबळे,प्रथम ढाळे, कार्याध्यक्ष अथर्व‌ सुरवडे खजिनदार पार्थ (मोन्या) माळवे मिरवणूक प्रमुख चेतन कायस्थ,सचिव प्रथमेश मिसाळ, सहसचिव अथर्व‌ जव्हेरी अशी पद नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन मंडळाला  पंचवीस वर्ष पुर्ण झाले असून यदां 26 व्या पदार्पण केले आहे. या सर्व पदाधिकाऱ्याचे मंडळाचे वतीने संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. या मंडळाची स्थापना 14 जानेवारी 2000 मध्ये झाली असून तेव्हापासून गणेश उत्सव सामाजिक उपक्रम तसेच मागील काही वर्षापासून करमाळा शहरात गणेश जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असुन हिंदू मुस्लिम बांधवही गुण्या गोविंदाने या मंडळात काम करत असून सर्व धर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे संस्थापक प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

9 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago