Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ६०,०००/- रूपये किंमतीची मोटार सायकल केली जप्त

 

करमाळा पोलीस ठाणेची  कामगिरी करून ६०,०००/- रूपये किंमतीची मोटार सायकल केली जप्त केली आहे यात हकिगत अशी कि, दि ०९/०८/२०२५ रोजी रात्रौ १० वा ते ०७/०० वा चे सुमारास फिर्यादी  ओंकार विलास शिराळ रा कृष्णाजी नगर करमाळा ता करमाळा जि सोलापूर यांचे मालकीची हिरो कंपनीची मोटारसायकल ६०,०००/-रु किंमतीची एक लाल रंगाची त्यावर काळा रंगाचा पट्टा ची मोटार सायकल तिचा आर टी ओ नं. एम एच १३ ए. क्यु ०५९१ चेसी नं. MBLHA10E8GC24775 व इंजिन नं. HA10EB8GG52548 असा असलेली जु. वा. किं. अं. असा असलेली त्यांचे राहते घरा समोर कृष्णाजी नगर करमाळा, करमाळा, ता. करमाळा येथून चोरी झालेबाबतचा दि. १३/०८/२०२५ रोजी करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ६६९/२०२५ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रंणजीत माने यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रंणजीत माने यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे शरद बाबुराव सुकळे, वय ३५ वर्षे, रा. वरकुटे (मु) सध्या रा कृष्णाजी नगर, करमाळा, ता करमाळा, जि सोलापुर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले, गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा करमाळा शहरात फिरत असलेबाबत माहीती मिळाली असता सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळुन आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपी मजकूर याचे ताब्यातून ६०,०००/- रूपये किंमतीची मोटार सायकल हिरो कंपनीची पेंशन या वर्णननाची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ / १६८५ ऐ. एस. मोहोळकर हे करत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ‌ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना  वैभव ठेंगल, पोकों रविराज गटकुळ, पोकों मिलीद Watching, पोकॉ/८ अर्जुन गोसावी, पोक का येवले पोकों  भराटे, पोकॉ रंदिल, पोकों/खोटे तसेच सायबर पो ठाणे कडील पोहेको व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…

13 hours ago

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी…

23 hours ago

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…

1 day ago

तुषार जाधव यांची शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

    करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…

2 days ago

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महावि‌द्यालयास मान्यता

  करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…

2 days ago