Categories: करमाळा

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठाण आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*

करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पारंपरिक उत्सवांची शान असलेल्या दहीहंडी सोहळ्याला यंदा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा दहीहंडी उत्सव तालुक्यातील सर्वात मोठा ठरला. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या दहीहंडी उत्सवाने करमाळ्यातील जनतेला एकत्र आणत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप सरचिटणीस सचिन शिंदे, जेष्ठ नेते राजकुमार (नाना) पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उपक्रमाचे कौतुक करताना परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधणाऱ्या या उत्सवाला शुभेच्छा दिल्या, उत्सवात युवकांचा सहभाग लक्षणीय होता. तालुक्यातील विविध भागातून गोविंदा पथके मोठ्या उत्साहात करमाळ्यात दाखल झाली होती. ‘आकाशाला भिडणारी मानवी रचना’ साकारून गोविंदांनी दहीहंडी फोडताना दाखविलेली ताकद, शिस्त आणि टीमस्पिरिट पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
शिवशंभु गर्जना चे अभिजीत जाधव व अनु जाधव यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम, ढोल-ताशा पथकांचे वादन आणि डॉल्बी सिस्टीमवर वाजणारे गजर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. संपूर्ण करमाळा शहरात दिवसभर उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांनी, लहानग्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेतला. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी या ठिकाणी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले,“दहीहंडी हा केवळ करमणुकीचा सोहळा नसून त्यामध्ये एकतेचा, धैर्याचा आणि चिकाटीचा संदेश दडलेला आहे. युवकांनी परंपरेला जोडून समाजकार्यातही आघाडी घ्यावी, हाच या उत्सवाचा खरा उद्देश आहे.”या उत्सवामुळे करमाळ्यातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. विविध गावांमधून आलेल्या पथकांनी, प्रेक्षकांनी व मान्यवरांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय बनविला. करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव या नावाला साजेसा ठरला.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago