Categories: Uncategorized

करमळ्यात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी निघाला मोर्चा


करमाळा प्रतिनिधी : करमाळ्यात आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व इतर मागण्यासाठी बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आला होता सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली पावसाचे वातावरण असताना देखील हजारोचे संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोर्चा तहसील कचेरी वरती येऊन धडकला सदर मोर्चे कऱ्यांच्या समोर भाषण करताना राजाभाऊ कदम म्हणाले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, केळीची रोपे कंपनीच्या किमतीप्रमाणेच शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेत, कंपनीपेक्षा दुप्पट तिप्पट किमतीने रोपे विकणाऱ्या एजंट वरती कृषी खात्याने कारवाई केली पाहिजे, पात्र केसरी रेशन कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये बसून धान्य मिळाले पाहिजे, तहसील कचेरीच्या पुरवठा शाखेमध्ये नाव कमी करणे व नाव वाढवणे चे अर्ज एक वर्षापासून पडून आहेत ती काम ताबडतोब होण्यासाठी सर्वर गतिमान केले पाहिजे, संजय गांधी योजनेचे पैसे लाभार्थ्यांना सहा महिन्यापासून मिळाले नाहीत त्यांना ताबडतोब पैसे मिळाले पाहिजे, नवीन मंजूर झालेले प्रकरणांना मंजूर होऊन तीन महिने झाले परंतु त्यांना अध्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यांना तत्काळ पैसे मिळावेत आमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभा निवडणुकी पुर्वि शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करतो असे सांगितले होते परंतु सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करायला तयार नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल रोष आहे.
यावेळेस तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले तहसीलदार मॅडम म्हणाल्या कर्जमाफीची मागणी व इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये वरिष्ठांना कळवते केळीची रोपे एजंट दुप्पट तिप्पट किमतीने विकत आहेत तर केळी रोपाचे एजंट व कृषी अधिकारी आणी राजाभाऊ कदम व मोर्चातील इतर कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन कंपनीच्या किमतीमध्येच रोपे शेतकऱ्यांना विकण्याच्या सूचना देण्यात येतील,
केसरी पात्र रेशन कार्ड धारक यांना धान्य मिळण्यासाठी अन्नसुरक्षा योजनेमध्ये नावे समाविष्ट करण्यात येतील,पुरवठा विभागातील सर्व गतिमान करण्यासाठी वेळोवेळी मी वरिष्ठांना कळविले आहे आताही आपले निवेदन वरिष्ठांना मी कळवीत आहे.
यावेळी मार्केट कमिटीचे संचालक शंभूराजे जगताप, माजी उप सभपती दत्ता सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे, प्रहार अध्यक्ष संदीप तळेकर, आदींची भाषणे झाली मोर्चामध्ये सहभागी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय गव्हाणे, पोत्रे सरपंच अंकुश शिंदे, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, प्रवीण ओहोळ,बाबा घोडके, युवा नेते प्रफुल्ल कदम मित्र मंडळ, अंगद लांडगे,तुकाराम घोंगडे,कालिदास कांबळे,अनिल कांबळे, खातगाव सरपंच अविनाश मोरे, आदिनाथ कोकरे, तात्या काळे मच्छिंद्र गायकवाड,दत्ता राक्षे अतुल राक्ष, सतीश राक्षे,महादेव कडाळे,बिबीशन खरात,अतुल चव्हाण ,कल्याण कोठावळे, संदीप मरकड,किसना हरणावळ,इसाक शेख, जुबेर शेख, नितीन मारकड, रामा मारकड,श्याम गायकवाड, बापू गायकवाड, मारुती भोसले, आप्पा भोसले, अर्जुन भोसले, बाबासाहेब कोपनर, दादा ,प्रदीप धेंडे,सुनील गरड,राजेंद्र कांबळे,शिवाजी कुंभार, जितेंद्र लांडगे,हनुमंत खरात, राहुल खरात,सुभाष जरांडे,बबन भालेराव,सुधाकर पवार,लहू भालेराव,अमोल भोसले,सोमनाथ देवकते, सोमनाथ गुरव,नामदेव कोठावळे,राजू सरतापे, मारुती जंजाळ,प्रवीण कांबळे, आबा गरड,पांडू शिंदे,भाऊ हजारे,कुंडलिक चोरमले,भीमा रंधवे,सुभाष गायकवाड, मयूर शिंदे,प्रेमचंद कांबळे, परमेश्वर पोळ आधी हजारो शेतकरी उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago