करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर ता करमाळा येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ शनिवारी महाआरोग्य शिबीराचे आयोजन केल्याची माहिती सभापती अतूलभाऊ पाटील यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर बोलताना सभापती पाटील यांनी सांगितले की जेऊर येथे दिनांक २३ रोजी शनिवारी हे आरोग्यदायी शिबीर होणार असून ते संपूर्ण पणे मोफत आहे. शिवाय रुग्णांना औषधे सुध्दा मोफत दिली जातील. या शिबीरामध्ये डॉ अविनाश राऊत (अस्थिरोग तज्ञ), डॉ अमोल डुकरे (बालरोग तज्ञ), डॉ अंकुश पवार (भुलतज्ञ), डॉ संतोष अडगळे व डॉ विशाल बंडगर (स्री रोग तज्ञ), डॉ अनिल खटके (नेत्र शल्यचिकित्सक) आदि मान्यवर डॉक्टर उपस्थित राहुन आरोग्य तपासणी करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत तपासणी चालू राहील. तरी रुग्णानी या शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सभापती अतुल भाऊ पाटील यांनी केले. तर दिनांक २६ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील आनंद ऋषी नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी जेऊर येथे रुग्ण तपासणी करण्यात येईल. सदर सहभागी रुग्णांना मोफत अहिल्यानगर येथे नेण्यात येऊन मोफत शस्त्रक्रिया केली जाईल व मोफत औषधे देऊन घरी पोहोच केले जाईल. तरी याचा लाभ नेत्र रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य संदिपशेठ कोठारी यांनी केले. तर आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी साठी ९७६३४०२५८० या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन वाढदिवस संयोजन समिती सदस्य किरण पाटील व जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश भैय्या कांडेकर यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…