भारत देशामधून फक्त शंभर टीचर्सचा सन्मान
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमाचा उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस च्या संस्थापिका ज्योती मुथा यांना 17 ऑगस्ट रोजी जयपूर येथे हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड चा बेस्ट अबॅकस टीचर म्हणून अवॉर्ड मिळाला या कार्यक्रमासाठी पूर्ण भारत देशामधून फक्त शंभर शिक्षकांना हा सन्मान देण्यात आला
नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा मधून प्रा. ज्योती मुथा यांची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व अबॅकस क्षेत्रातील त्यांचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश दिव्य मराठी यांचाही नारीशक्ती गौरव हा पुरस्कार या सर्व संदर्भाचा विचार करून.
हा अवॉर्ड त्यांना घोषित करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुवर्णपदक सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व शैक्षणिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन,आयोजन जयपूर येथील चीफ एडिटर अँड डायरेक्टर ऑफ हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड अभिषेक सोनी यांनी केले व कार्यक्रमासाठी कपिल शर्मा यांची ही आवर्जून उपस्थिती तेथे होती करमाळा जैन श्री श्रावक संघातर्फे ही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या यशाच्या पाठीमागे आई-वडील व दिनेश मुथा यांचे अनमोल सहकार्य मार्गदर्शन लाभले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…