चिखलठाण विकासाचे रोल मॉडेल म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जाईल – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी   चिखलठाण गाव करमाळा तालुक्यात विकासाचे रोल मॉडेल म्हणुन ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. ते चिखलठाण येथे ग्रामपंचायतीच्या नुतन कार्यालयाच्या व विविध विकासकामांच्या उद्घघाटन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते . यावेळी व्यासपीठावर चिखलठाणचे सरंपच. व कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक चंद्रकांत काका सरडे , माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे मा जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी काँग्रेसआयचे तालुकाअध्यक्ष दादासाहेब लबडे ,कंदरचे सरपंच भास्कर आण्णा भांगे ,अर्बन बँकेचे चेअरमन नगरसेवक कन्हैयालाल देवी ,आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीबापु झोळ , जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप ,युवा नेते सुनिल बापु सावंत उपसरपंच आप्पासाहेब सरडे, माजी उपसरपंच अमोल मराळ यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळीबोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की चंद्रकांत काका सरडे एक उच्च शिक्षित नेतृत्व असुन चिखलठाण सह परिसरातील गावच्या विकासासाठी ते सतत पाठपुरवा करत असतात. सुशिक्षित व खंबिर नेतृत्वा कडे सत्ता असल्यास विकास कामे मंजुर करणे व ती प्रभावी पणे राबवणे सोपे जाते हेच चिखलठाणच्या विविध विकास कामामुळे दिसुन येते आहे. भविष्यात चिखलठाण हे गाव करमाळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचे रोल मॉडेल ठरेल असे  गौरवोद्गगार आ. संजयमामा शिंदे यांनी काढले. तसेच भविष्यात चिखलठाण च्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले.


करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली चिखलठाणचा चेहरमोहरा बदलणार आहे. सध्या गावातील सर्व समाज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, गावातील बंदिस्त गटारी, हायमास्ट दिवे यांची कामे पुर्ण झाली असुन येत्या काळात गावांतर्गत सर्व रस्ते कॉंक्रीटीकरण करणार आहोत..- सरपंच चंद्रकात काका सरडे

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

6 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

6 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

12 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago