Categories: करमाळा

शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षवाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- दिग्विजय बागल एक दिवसांत 9 शाखांचे उदघाटन

करमाळा प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षवाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- दिग्विजय बागल. एक दिवसांत 9 शाखांचे उदघाटन – करमाळा तालुक्यातील गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक करण्यासाठी दिग्विजय बागल प्रत्येक गावात शाखा निर्माण करत आहेत दि 20 रोजी तालुक्यातील पश्चिम भागात को. चिंचोली,टाकळी,खातगाव१,खातगाव२,खातगाव३,रामवाडी,कावळवाडी,भिलारवाडी,जिंती या गावांमध्ये शिवसेना शाखा उद्घाटन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील पक्षकार्यास शुभेच्छा देत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी बोलताना सांगितले की यावेळी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा स्थापण्यात येणार आहेत घर तेथे शिवसैनिक तयार करणार असून, याद्वारे लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिंती येथील मुख्य कार्यक्रमात दिग्विजय बागल यांनी सांगितले तरुणाची ओढ ही शिवसेना पक्षाकडे असून त्यातून लोकांची विविध प्रकारची कामे करणार असून , आम्ही केवळ निवडणुकांपुरते लोकांच्या दारात जात नाही तर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात कायम त्यांच्यासोबत असतो. तालुक्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असून, येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवल्या जातील. आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षवाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून गावागावातून शिवसेनेच्या शाखा उद्घाटनासाठी आग्रह होत आहे़.यावेळी मकाई सह,साखर कारखाण्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर,संचालक बाळासाहेब पांढरे, आशिष गायकवाड, दत्ता गायकवाड, अजित झांजूर्ने,गणेश तळेकर, विलास काटे, मोहन,गुळवे, गणेश तळेकर नंदू भोसले, महेश तळेकर ,दिनकर सरडे, रामभाऊ हाके, सतिष निळ,मुकुंद गिरमकर,शिवसेना युवासेनेचे विशाल गायकवाड व पश्चिम भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .भिलारवाडी येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करताना शिवसेना नेते दिग्विजय बागल ,रामभाऊ हाके, दत्ता गायकवाड व उपस्थित सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago