करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या दिनांक २३ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजऱ्या होत असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेऊर ता करमाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे संयोजन रक्तदान व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले महेश रणदिवे करणार आहेत. महेश रणदिवे यांना विविध राज्यामधील सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. महेश रणदिवे यांना ओरीसा सरकारने राष्ट्रीय समर्पण पुरस्कार तर हिमाचल शासनाने शहिद भगतसिंग राजगुरू सुखदेव राष्ट्रीय पुरस्कार तसेच
राजस्थानने आदर्श राष्ट्रीय युवा पुरस्कार दिला आहे. पुणेकरांनी रणदिवे यांनी कोव्हीड मध्ये रक्तदान व प्लाझ्मा मधील सर्वोच्च योगदानाबद्दल २०२४ मधील शिवकार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्रातील सर्व भागात रणदिवे यांनी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे युवकांसाठी प्रेरणादायी असे कार्य केलेले महेश रणदिवे या शिबीराचे संयोजन करणार असल्याने युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करुन एका राष्ट्रीय उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जूनराव सरक यांनी केले. तसेच दिनांक २३ ऑगस्ट रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर खिस्ती फीट फॅमिली अहिल्यानगर व गोल्डन वेलनेस सेंटर जेऊर यांच्यावतीने नागरिकांसाठी फ्री बॉडी चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मोटिव्हेटर नितीन पाटील यांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…