Categories: करमाळा

म्हसेवाडी तलाव भरण्यासाठी दहीगाव उपसा सिंचन मधून पाणी सोडण्याची गणेश चिवटे यांची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील म्हसेवाडी तलाव पावसाळ्याच्या दिवसांमध्येही भरला नाही, तो तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेतून भरण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी लघुपाटबंधारे विभाग, करमाळा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र त्याचा लाभ म्हसेवाडी तलावाला मिळत नसल्याने गावकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. म्हसेवाडी तलावावर म्हसेवाडीसह पांडे, करंजे, भालेवाडी आणि अर्जुननगर ही चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तलाव रिकामा असल्याने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबत शेतीसाठीही पाण्याची गंभीर परिस्थिती ओढवली जाणार आहे. चिवटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात पुरेशा पावसाचे आगमन झाले असले तरीही पाण्याची योग्य नियोजनबद्ध सोय न झाल्याने तलाव रिकामा राहिला आहे. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तलाव भरणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला आहे असे चिवटे यांनी यावेळी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेला हा विषय तातडीने सोडवून म्हसेवाडी तलाव भरला तर पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा म्हसेवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे व्यक्त केली होती,
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस आजिनाथ सुरवसे , उपसरपंच अमोल पवार ,पत्रकार दिनेश मडके , जयंत काळे पाटील, नानासाहेब अनारसे उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

12 hours ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

22 hours ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

22 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

2 days ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

2 days ago