Categories: करमाळा

सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने 24 ॲागस्टला सुरताल संगीत आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव पुरस्कार सन्मान सोहळा डॉ.महेंद्र नगरे यांना सुरताल करमाळा भुषण पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सव आणि पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा सुरताल करमाळा भुषण डॉ महेन्द्र नगरे करमाळा, सुरताल संगीत शिरोमनी पंडीत सुदर्शन राजोपाध्याय नेपाळ, सुरताल नृत्य भुषण डॉ दुमीथा गुनवर्धना श्रीलंका, सुरताल नृत्य कलानिधी श्रीमती तन्नी चौधरी कोलकत्ता, सुरताल नृत्य शिरोमणी श्रीमती बंधना बरूआ गुवाहाटी यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व सिद्धनाथ नागरी पतसंस्थेच्या संचालिका सोनाली ताई जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात कोलकत्ता, गुवाहाटी, श्रीलंका, नेपाळ येथील दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता विकी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील रसिक प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago