Categories: करमाळा

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी साहील रोडे तर उपाध्यक्षपदी अक्षय बनकर व शाबीर शेख


करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्याची निवड सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून या मध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी साहील रोडे तर उपाध्यक्षपदी अक्षय बनकर व शाबीर शेख यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्षपदी आदित्य देशमाने ,मिरवणूक प्रमुखपदी अल्लाउद्दीन शेख , उप मिरवणूकपदी, महेश अंधारे तसेच लखन उबाळे ,सचिव पदी ओमकार सावंत तर सहसचिव रविंद्र सुरवसे तर खजिनदार म्हणून योगेश काकडे सल्लागार सुजित शेळके संघटक म्हणून बंटी शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडीच्या वेळी सुनील बापू सावंत म्हणाले की ,या मंडळाची स्थापना सन १९४७ साली कै, अनंतराव आबा सावंत यांनी केली असून पुढे हमाल पंचायत चे संस्थापक सुभाष अण्णा सावंत यांनी ही परंपरा चालवली आमच्या मंडळात सर्व हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना गणेश उत्सव मंडळात पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाते प्रत्येक सण मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो तर आमच्या मंडळाची मिरवणूक ही विना पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडते ही मंडळाची वर्षानुवर्षे ची परंपरा असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले .शेवटी आभार बापू उबाळे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago