Categories: करमाळा

रविवारी सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन


करमाळा प्रतिनिधी: करमाळा येथील सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सुर ताल संगीत नृत्य महोत्सव व पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विकी मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली.
करमाळा तालुक्यात संगीताची परंपरा जपण्यासाठी सुरताल संगीत विद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संगीताला प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर कलाकारांना येथे आमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम सादर केले जातात. तसेच विविध पुरस्काराद्वारे त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे तालुक्यातील संगीत प्रेमी साठी हे विद्यालय एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.
यंदा सुर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांना गौरविण्यात येणार आहे .यामध्ये- पंडित सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ- सरोद) यांना सुरताल संगीत शिरोमणी पुरस्कार , डॉक्टर दुमिथा गुणवर्धन (श्रीलंका- कथक) यांना सूरताल नृत्यभूषण पुरस्कार, श्रीमती बंदना बरूआ (गुवाहाटी – सत्रीय) यांना सूर ताल नृत्य शिरोमणी पुरस्कार, तंन्नी चौधरी (कोलकत्ता- कथक) यांना सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार, डॉ महेंद्र नगरे यांना सूरताल करमाळा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 51 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबतच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत रसिकांना रंगतदार संगीत मेजवानी मिळणार असल्याने जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. नरारे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago