Categories: करमाळा

सेंद्रिय खतांचा वापर करणे ही काळाची गरज – तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके


करमाळा(प्रतिनिधी) – सेंद्रिय खतांचा वापर करून विषमुक्त कृषी उत्पादन करणे हे भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी आणि जमिनींचा पोत सांभाळण्यासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी येथे बोलताना केले.
विजयराव पवार यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री स्वामी समर्थ एग्रो या सेंद्रिय खतविक्री दुकानास त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे व त्यांच्यासमवेत असलेल्या कृषी सहाय्यक उमाकांत जाधव यांचे स्वागत  पवार दादा जमदाडे यांनी केले. राजेंद्र नेटके यांची करमाळा कृषी कार्यालयाचे प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा व जाधव यांचा पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. नेटके यांनी  विजय पवार यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले,हनुमंत भांडवलकर आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago