Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी उघडकीस २४,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र केले जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी उघडकीस २४,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र केले जप्त केले.यात हकिकत अशी कि, दि २२/०८/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०० वा ते दि. २३/०८/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वा चे दरम्यान फिर्यादी नामे रोहीत महादेव पुजारी, वय २२ वर्षे व्यवसाय पुजारी, रा. देवीचा माळ, करमाळा ता करमाळा जि सोलापूर यांनी मौजे देवीचा माळ येथील कमला भवानीच्या मंदिरातून कमलाभवानी उत्सव मुर्तीचे गळयातील २४,०००/-रु किंमतीचे दोन वाटया असलेले व त्याला चार मणी असलेले सोन्याचे अंदाजे २.४ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददाम लबाडीने चोरुन नेले बाबत करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ६९५/२०२५ बी एन एस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांनी अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सागर बाळू राउत, वय ३१ वर्षे, रा. कुंकुगल्ली, करमाळा, ता करमाळा, जि सोलापुर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले, गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा करमाळा शहरात असलेबाबत माहीती मिळाली असता सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळुन आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपी मजकूर याचे ताब्यातून २४,०००/- रूपये किंमतीचे वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/१६८५ ऐ. एस. मोहोळकर हे करत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो. से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना /९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/१६७ मिलींद दहीहांडे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/६८९ येवले पोकों / २५ भराटे, पोकॉ/१५२४ रंदिल, पोकॉ/९६१ खोटे तसेच सायबर पो ठाणे कडील पोहेकॉ / २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगावचे पाणी पेटले… २ दिवसांत पाणी सोडा…अन्यथा २९ तारखेला ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा…

1 day ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…

2 days ago

सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी संजयमामांना द्यावी : विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…

2 days ago

करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीची गरूडझेप सोलापूर जिल्ह्याचा नवा आदर्श ठरणार – जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले

करमाळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन…

3 days ago

करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  प्रतापराव जगताप यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; 130 महिलांची मोफत देवदर्शन यात्रा, 190 जणांना एसटी सवलत कार्ड

  करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि.…

3 days ago