Categories: करमाळा

एक्सप्रेस गाडीच्या थांब्या सह पारेवाडी रेल्वे स्थानकावरील विविध मागण्यांचे करीता माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी कार्यकर्त्यासह घेतली विभागिय रेल्वे व्यवस्थापकांची भेट


करमाळा प्रतिनिधी .मंगळवार दिनांक-२६/८/२०२५ रोजी करमाळ्याचे माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी सोलापुर येथे कार्यकर्त्यासह रेल्वेचे विभागिय रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेतली. यावेळी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा या मागणीसह रेल्वे स्टेशनला नवीन पादचारी पुल, गेट नं-२८ मधील रस्त्याचे कामासह वॉलचे काम आणि गेट नं-२८ मधील बोगद्यातील स्टेशनकडे येण्यासाठीचा रस्ता सरळ करणे बाबतच्या प्रमुख मागण्या निवेदना द्वारे सादर केल्या. याप्रसंगी प्रामुख्याने पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासुन होत असलेली एक्सप्रेस गाडीच्या थांब्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविणेची विनंती केली असुन यास डिआरएम यांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कुर्डुवाडी, केमसह अन्य स्थानकावरील समस्यांबाबत देखिल यावेळी चर्चा झाली असुन या भेटीचे प्रसंगी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सह, माजी जि. प. सदस्य शिवाजीराजे कांबळे, कुर्डुवाडीचे उदयोगपती श्री. निलेशशेठ धोका, बबलु कांबळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड.अजित विघ्ने, केत्तुरचे सरपंच सचिन वेळेकर, प्रशांत नवले, बबननाना साळवे, सचिन खेडकर, स्वीय सहाय्यक संजय अंबोले यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. करमाळा तालुक्याचे रस्ते, वीज, पाणी, रेल्वे यासह अनेक प्रश्नाचे संदर्भात कार्यकर्त्यांचे सुचनेप्रमाणे आपण कायम कार्यतत्परतेने प्रत्येक समस्येचे निराकरण करत असुन, विकासकामाचे प्रक्रीयेत कायम सहभागी असलेचे यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. आज संजयमामांनी सोलापुर येथे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची देखिल भेट घेतली असुन विविध शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago