करमाळा प्रतिनिधी: – मांगी (ता. करमाळा) : – “प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते. मोठे होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन करमाळा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संजयकुमार घुगे यांनी केले. मांगी येथील प्रगती विद्यालयात तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ यांच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
न्यायाधीश घुगे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना अन्याय सहन करू नये. कुठलाही अन्याय झाल्यास प्रथम पालकांना, त्यानंतर शिक्षकांना कळवावे. तसेच १८ वर्षांखालील मुलांना न्यायालयामार्फत मोफत वकील मिळतात. राज्यघटनेत दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून जिद्दीच्या जोरावर प्रगती साधावी.”
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर श्री. ए. के. शर्मा, करमाळा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अलीम पठाण, वरिष्ठ सदस्य ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, ॲड. राहुल सावंत, ॲड. बलवंत राऊत, ॲड. प्रशांत बागल, अॅड. अक्षय वीर, अॅड. विश्वजीत बागल, अॅड. बालाजी इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा देवकर, गावचे उपसरपंच श्री. नवनाथ बागल, पोलीस पाटील श्री. आकाश शिंदे श्री. राहुल बागल, श्री. शुभम बागल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश श्री. शर्मा साहेब यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
ॲड. अक्षय वीर यांनी पॉस्को कायदा,
ॲड. प्रशांत बागल यांनी वाहतूक कायदा,
ॲड. राहुल सावंत यांनी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयावर तर
ॲड. डॉ. बी. टी. हिरडे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक अॅड. विश्वजीत बागल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक आर. पी. खराडे तर संयोजन कनिष्ठ लिपिक श्री. पी. डी. करपे व श्री. मेटकरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. विक्रम चौरे यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा देवकर यांनी सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने येथेच्छ स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रगती विद्यालय मांगीचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…