Categories: करमाळा

दिपक आबा देशमुखांनी लोकविकासच्या धर्तीवर दुसरा मोठा प्रकल्प उभारावा-ॲड बाबुराव हिरडे

करमाळा प्रतिनिधी
लोकविकास डेअरीच्या धर्तीवर दीपक आबा देशमुख यांनी तालुका पातळीवर दुसरा मोठा व्यवसायिक प्रकल्प उभारावा, असे आवाहन करमाळ्याचे डॉ. बाबूराव हिरडे यांनी केले. लोकविकास डेअरीचे संस्थापक दीपक आबा देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला केडी एक्सपोर्टचे मालक किरण डोके, व्यापारी भूषण सेठ लुंकड, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. शिवाजीराव बंडगर, राजेंद्र रणसिंग, उद्योजक दत्ता पवार, वैभव पोळ, तात्या कळसाईत, भागवतराव पाटील, डॉ. शिंदे, भारत अण्णा साळुंखे, करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव,साळुंखे बंधू, शेतीतज्ञ सोमनाथ हुलगे,विलास अप्पा लबडे शिवाजी सरडे,अमर ठोंबरे महेंद्र पाटील राहुल लोंढे लतीफ तांबोळे परेश दोशी, अंगद पाटील विजय लबडे नानासाहेब साळुंके विष्णू पोळ, गंगाधर पोळ सचिन बोराडे राजू घोडके असे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. हिरडे पुढे म्हणाले की, देशमुख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गेल्या ३२ वर्षांपासून दुधाचा प्रकल्प यशस्वीरित्या चालवून स्वतःचा ‘लोकविकास’ हा स्वतंत्र ब्रँड निर्माण केला आहे. आता त्यांनी तालुक्यातीलइतर उद्योजकांना एकत्र आणून एक मोठा विकासात्मक प्रकल्प उभारावा. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना बाजारपेठ मि ळेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि तालुक्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल. किरण डोके यांनी दिपक आबा देशमुख यांचे कार्य इतराना अनुकरणीय असून, ते कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कोणतीही लाज न बाळगता व्यवसायाशी एकनिष्ठ बांधील असणारे व्यक्तिमत्व आहे. श्री. लुकड यांनी गुणवत्तेवर तडजोड न करणारे व्यवसायिक आहेत. तर श्री. रणसिंग यांनी दिलेला शब्द पाळणारा व सचोटीने काम करणारा व्यवसायिक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य हितचिंतक उपस्थित होते.
आजचा हा सत्कार माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. तालुका पातळीवर प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मांडलेल्या सूचनेबाबत मी सकारात्मक विचार करेन. घाईगडबड न करता योग्य ती तयारी, सर्वांचा सल्ला व मते जाणून घेतल्यानंतरच कोणता व्यवसाय इथे यशस्वी होऊ शकतो, याचा ठाम निर्णय घेऊन उद्योग सुरू करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.”
दिपक देशमुख, वांगी

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago