Categories: करमाळा

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब वेताळ पेठ करमाळा यांच्यावतीने 30 ऑगस्ट रोजी मोफत रक्त तपासणी नेत्र मोतीबिंदू शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन -प्रशांत ढाळे

 करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब करमाळा यांच्यावतीने गणेश उत्सवानिमित्त रक्तदान व रक्त तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन ‌ शनिवार दिनांक ‌ 30 ऑगस्ट रोजी संजीवनी हॉस्पिटल ‌वेताळपेठ करमाळा येथे करण्यात आले असल्याची माहिती ‌ गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे ‌ संस्थापक अध्यक्ष ‌ माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब ‌ धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमात ‌ सदैव अग्रेसर राहून काम करत असून ‌यंदाच्या वर्षी करमाळ्याच्या नागरिकांच्या ‌ आरोग्याची काळजी म्हणून ‌ त्यांनी यंदाच्या वर्षी मोफत रक्त तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तातील शुगर HBA1C ,KFT किडनी टेस्ट,LTF लिव्हर टेस्ट, cholesterol कोलेस्ट्रॉल, thyroid थायरॉईड लिपिड प्रोफाइल या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. हे रक्त तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत ‌ रक्तदान शिबिर सकाळी 10ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून ‌ रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. तरी करमाळा शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ‌ गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब ‌ यांच्यावतीने ‌ प्रशांत ढाळे केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

7 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago