Categories: करमाळा

डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजनेच्या निकषाप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व स्वाधार योजना यांच्या निकषात बदल करावा. प्रा. रामदास झोळ सर*

 

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय श्री. संजय शिरसाट साहेब व महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री श्री.अतुल सावे साहेब यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,भाजपा नेते रामदास झोळ सर यांनी भेटून पुढील विषयावर निवेदन दिले. यामध्ये पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता ही योजना खुला प्रवर्ग, इबीसी प्रवर्ग, एसईबीसी तसेच ई डब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी सरसकट लागू आहे. तसेच त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाख रुपये एवढी आहे. याचप्रमाणे ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे परंतु ही योजना फक्त शहरी भागाकरता असून उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये एवढी आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त 600 विद्यार्थ्यांनाच याचा लाभ देण्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे परंतु ही योजनाही फक्त शहरी भागांसाठीच लागू असून उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये एवढी आहे.
या तीनही योजने मधील फरक पाहता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेमध्ये उत्पन्नाची अट अडीच लाखावरून आठ लाख रुपये करावी,शहरी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा, प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांची मर्यादा शिथिल करावी.
आणि स्वाधार योजनेमध्ये अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा वाढवून आठ लाखाची उत्पन्न मर्यादा करावी, तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळावा.
अशा असे निवेदन प्रा.रामदास झोळ सर यांनी दिले असून दोन्हीही मंत्री महोदयांनी या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून हे विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

6 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago