समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात गणरायाच्या चरणी हार, फुले, मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल आणि शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन घारगाव ग्रामपंचायत सदस्या आणि माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.
दिनांक २७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या दहा दिवसात गणरायाच्या पूजेत हे साहित्य अर्पण करून त्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना होईल असे त्यांनी सांगितले या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पक्ष संघटनाकडून विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात सरवदे यांनी विशेषता गणेश भक्तांना हार फुलाबरोबर शैक्षणिक साहित्य अर्पण करून उपक्रमाला हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एक वही एक पेन उपक्रम राबवून गणेश भक्तांना यात सहभागी होण्यासाठी प्रोस्ताहीत करावे. गणेशोत्सवात जमा झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात यावे , असे ही सरवदे यांनी सांगितले.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…