Categories: करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा फार्मसी, इंजिनिअरिंग महाविद्यालयांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला फार्मसी, इंजिनिअरिंग इत्यादी महाविद्यालयांचा सहभागी झाले उद्घाटन सचिव सौ. माया झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने संस्थेअंतर्गत फार्मसी, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, अशा विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया आणि इंटरनेटपासून थोडा वेळ दूर राहून मैदानी खेळ खेळणे हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळामध्ये सहभाग घेतल्याने एकाग्रता, सहकार्य व नेतृत्वगुण विकसित होतात.”या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, लेझीम, करम, बुद्धिबळ, क्रिकेट यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

3 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

23 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago