Categories: करमाळा

ओबीसी मराठा एकच त्यामुळे वाद न करता आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा- औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी ओबीसी मराठा एकच त्यामुळे वाद न करता आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन.श्रीमंत- औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.* ओबीसी हा इंग्लिश शब्द आहे.आँदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतरमागासवर्ग सर्व ओबीसींची जात ही मराठा आहे.आजच्या जातीची ओळख हे व्यवसायावरून आहे. गावगाड्यांमध्ये जीवन जगत असताना सर्व जीवनावश्यक वस्तू सोयी सुविधा उपलब्ध होऊन जीवन सुखी होण्यासाठी आणि त्याचा मोबदला आपल्याच माणसांना मिळावा या उद्देशाने मराठा समाजामध्ये कामाचे नियोजनबद्ध वाटप झाले.चर्म,चमडे,चांभ यांचे काम करणारा चर्मकार म्हणजेच चांभार,लोखंड म्हणजे लोहाचे काम करणारा लोहार,फुलाची माळ विनणारा माळी,गावाची राखण करणारा राखणदार म्हणजे सिक्युरिटी त्यांना महाराखणदार ही पदवी दिली आहे.त्याचा अपभ्रमश होऊन महार,विणकाम करणारा कोष्टी, कपडे शिवणारा शिंपी,मातीचा कुंभ बनणारा कुंभार,धनाचे आगर असणाऱ्या शेळ्यामेंढ्या सांभाळणारा धनगर.राजेमल्हारराव होळकर हे धनगर व्यावसायिक परंतु यांची इतिहासात व आजही इंदोरमध्ये ओळख मराठा सरदार अशी आहे.सोन्याचे काम करणारा सुवर्णकार म्हणजे सोनार, कोलांट्या उड्याचा खेळ करणारे कोल्हाटी,धान्यापासून तेल बनविणारा तेली,लाकडाला सुता सारखा सरळ करणारा सुतार, साळी,कैकाडी,डवरी,रामोशी, मातंग,गोसावी,कोळी अशा आठरा पगड बारा बलुते मध्ये विभागले गेले.कोण काय काम करतो यावरून त्यांची ओळख निर्माण झाली.त्याचे रूपांतर जातीमध्ये केले गेले.परंतु ही जात नसून हा व्यवसाय आहे.उदाहरणार्थ जात- मराठा ,व्यवसाय लोहारकी.जात- मराठा,व्यवसाय माळी.जात- मराठा व्यवसाय कुणबी.परंतु आपली सर्वांची जात मराठा आहे.हे मी विश्वासाने आणि अभ्यासाने नमूद करत आहे.शेतकरी व्यावसायिक म्हणजे कुणबीची ओळख मराठा म्हणून आहे.आणि इतर व्यवसायिकांची ओळख त्यांच्या व्यवसायानुसार निर्माण झाली व जाणून-बुजून करण्यात आली त्यामुळे आपणा मध्ये राजकीय फायद्यासाठी जातीद्वेष उच्च नीच भेदाभेद निर्माण केला जात आहे.परंतु आजही आपण गावगाड्यांमध्ये सर्वजण एकत्रच आहोत.आणि पुढेही एकत्रच राहणार,आपण सर्वजण वेगळे नाहीत.एकाच रक्त मांसाचे मराठा क्षत्रिय लढवय्ये आहोत.असे संत तुकाराम महाराजांनी देखील अभंगाद्वारे सूचित केले आहे. *तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोगपावे* ही भावना पुन्हा सर्वांच्या मध्ये निर्माण होऊन आपण सर्वजण मराठाच आहोत.याचा अभिमान बाळगून आपलाच एक बंधू आज पर्यंत देशाचे राष्ट्राचे संरक्षण करणारा. शेतकरी,कुणबी अडचणीत आहे. आत्महत्या करत आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी मदत म्हणून आरक्षण आवश्यक आहे.आणि मराठा म्हणजेच कुणबी आणि शेतकरी एकच आहेत.असे असंख्य पुरावे असताना देखील आरक्षण नाकारले जात आहे.धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत आणि कुणबी व मराठा एकच आहेत हे दोन विषय साधे सोपे असताना 75 वर्ष सरकारला दुरुस्ती करता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी विनाकारण ओबीसी मराठा आसा मतभेद न करता विरोध न करता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन नेरलेचे माजीसरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! बंद पडलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी पुन्हा धावणार; परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ग्रामीण भागाला दिलासा

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा…

1 day ago

करमाळ्यात १० किलो गांजासह युवक जेरबंद ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १०…

2 days ago

नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन…

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप…

4 days ago

आठ दिवसांत नेरले–गौंडरे रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

करमाळा प्रतिनिधी  नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी…

4 days ago

करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या…

4 days ago