Categories: करमाळा

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे ‌ गणेश उत्सव साजरा करण्याचा उपक्रम स्तुत्य -तहसीलदार सौ.शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी गणेश उत्सव‌ हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण असून गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे ‌ गणेश उत्सव साजरा करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत करमाळ्याच्या ‌कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले. गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब वेताळ पेठ करमाळा यांच्यावतीने आयोजित रक्त नेत्र तपासणी मोतीबिंदू ‌ व रक्तदान शिबिराच्या उद्घघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास शिबिरांचे ‌आयोजक गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष मा . नगराध्यक्ष प्रशांत ढाळे ,संजीवनी हॉस्पिटलचे डॉ .सुहास कुलकर्णी तसेच गजानन स्पोर्ट्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सौ. शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या की गजानन स्पोर्ट्स क्लबने मोफत रक्त तपासणी शिबिर ‌ नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणवा‌ या वृत्ती प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना ‌ खऱ्या अर्थाने ‌ नवजीवन देण्याचे काम केले असून गणेश मंडळांनी ‌ अशा पद्धतीची उपक्रम राबवून ‌ समाज कल्याणचा ‌ वसा जपावा त्या दृष्टिकोनातून ‌ या मंडळाचा ‌ मला विशेष ‌ अभिमान वाटत असून ‌ त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्यासाठी ‌ आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरामध्ये 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर नेत्र तपासणी 73 लोकांची करण्यात आली असून बऱ्याच नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व रक्ताची तपासणीमध्ये 135 नागरिकांची करण्यात आली आहे .‌ या आरोग्य शिबिरामध्ये 302 जणांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना प्रशांत ढाळे ‌ यांनी सांगितले की मंडळाचे 26 वर्ष असून या मंडळात सर्व जाती-धर्माची युवक कार्यरत असून‌ तन-मन घनाने गणेशा प्रती भक्ती भाव ठेवून समाजाच्या कल्याणासाठी काम करत असतात त्यामुळे आमचे मंडळ एका कुटुंबाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांच्या आरोग्याची‌ विशेष काळजी घेत आरोग्य शिबिर घेतल्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील जनतेकडून गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago