Categories: करमाळा

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ८,११,२५०/- रूपये किंमतीचा गांजा केला जप्त.

 करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी करीत ८,११,२५०/- रूपये किंमतीचा गांजा केला जप्त केला आहे. १ संप्टेंबर रोजी सकाळी ११/४० वा. चे. सुमारास रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी केलेली कारवाई केली आहे.
यात हकिगत अशी कि, दि ०१/०९/२०२५ रोजी सकाळी ११/४० वा चे सुमारास पोसई/सुशिलकुमार पाखरे, यांना गोपनिय बातमी मिळाली कि, मौजे केम ते कंदर रोडणे केम कडुण तीन इसम स्कुटर, चारचाकी वाहणात असुन ते गांजा विक्री साठी घेवुन येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर बाबत पोना पवार यांनी आम्हांस दिली. सदर बाबत आम्ही स्वतः अंजना कृष्णा व्ही. एस., उपविभागीय पोलीस अधिकारी साो करमाळा उपविभाग यांना माहीती दिली व सदर बातमीतील माहीती प्रमाणे कारवाई करीता लागणारी लेखी अधिकार पत्र घेवून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आम्ही स्वताः शासकिय पंच पोलीस स्टाफ असे मौजे कंदर कडे रवाना झालो.सदर ठिकाणी गेल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे केम कडुन कंदर जाणारे रोडवर जावुन थांबलो असता केम केम कडुन कंदर च्या दिशेने एक बिगर नंबरवी स्वीफट कार व एक बिगर नंबरची अॅक्टीव्हा स्कुटर येताणा दिसली त्याचा आम्हांस मिळालेल्या बातमी प्रमाणे संशय आला त्यावेळी आम्ही त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते थांबले नसल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला असता त्यांनी त्याची वाहणे मौजे कंदर हट्टीतील केम कंदर रोडवर डावीकडे वळवुन विजय नवले यांचे घराकडे जाणारे कच्चा रोडणे जात असताना त्यांना जागी थांबविले त्यावेळी ती वेळ १६/५५ वा ची होती. त्वरीत पोलीस स्टाफने सदर इसमास घेराव टाकुन आम्ही स्वताःव सोबतचे पंचानी व पोलीस स्टाफचा पुर्ण परीचय देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचे आम्ही परीचय दिला सदर इसमा पैकी अॅक्टीव्हा स्कुटर चालवित असलेल्या इसमासा त्यांचा नाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव सचिन नागनाथ निवाळ वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा नि सोलापुर असे सांगितले त्यांचे पाठिमागे असलेल्या स्विप्ट कार मध्ये असलेल्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नाव आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा जि सोलापुर व त्याचे सोबत दुस-या इसमास नाव विचारले असता सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे र वेणेगाव ता माढा जि सोलापुर असे असल्याचे सांगितले.
सदर बातमीतील दोन्ही वाहणात आम्ही स्वताः पंचासमक्ष सदर वहानाची तपसणी केली असता सचिन नागनाथ निचाळ वय २६ वर्षे र वेणेगाव ता माढा जि सोलापुर यांचे ताब्यातील बिगर नंबरवी अॅक्टीव्हा गाडीचे डिक्कीत त्यांने उघडुन दाखवली असता त्यांचेत एक चिकटपट्टीने पॅक केलेले पाकीट व स्वीफट कार मध्ये बसलेले इसम नामे १) आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा जि सोलापुर २) सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे र वेणेगाव ता माढा जि सोलापुर स्वीफट मधील इसम नामे सचिन सुरेश बावळे यांने गाडीची डिक्की उघडुन दाखवले व सदर डिक्की मध्ये पाच चिकटपट्टीने पॅक केलेले पाच पाकीट मिळून आले सदर सहा पाकिटे पंचा समक्ष आम्ही स्वताः व पंच यांनी उघडुन पाहिली असता त्यात झाडपत्ती सारखा ओलसर व उग्र वास येणारा गांजा असल्याचे दिसुन आले असे एकुण सहा पाकीटे दोन्ही वाहणाचे तपासणी करून मिळून आला त्याचे वजन १३ किलो ४५० ग्रॅम प्रति किलो अंदाजे भाव २५,०००/- प्रमाणे ३,३६, २५० रु किंमतीचा गांजा मिळून आला व सदर इसमाकेडे अॅक्टीव्हा स्कुटर ची किंमत ७५,०००/- व स्वीफट गाडी ची किंमत ४,००,०००/- असे एकुण ८,११, २५० आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर बाबत पोना ११६२ मनिष पवार यांनी आरोपी नामे १) सचिन नागनाथ निचाळ वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा जि सोलापुर २) आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा जि सोलापुर ३) सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे र वेणेगाव ता माढा जि सोलापुरयांचे विरूध्द सरकार तर्फे फिर्याद दिली असुन गुरनं ७२५/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (11) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीसदर आरोपी नामे आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा वेणेगाव ता माढा जि सोलापुर याचे विरूध्द असलेले दाखल गुन्हे तक्ता अ.क. गुन्हा रजि. नंबर ०१टें भुर्णी पो. ठाणे गुरनं.
मंद्रप पो. ठाणे गुरनं. ३५४/२०२०टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ५१८/२०२३,टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ९३०/२०२४,टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ५२८/२०२५कलम भा.द.वि.कलम ३९२,३४ भा.द. वि. कलम ३९२,३४१,३६३,५०६,३४भा.द.वि. कलम ३२३,५०४, ५०६,३४ भा. न्या. सं. कलम ११५ (२), ३५१(२), ३५२ भा.न्या. सं. कलम ११५ (२), ३५१(२), ३५२
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही.एस., करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई / सुशिलकुमार पाखरे, सपोफौ शिनगारे, पोहेकॉआप्पासाहेब लोहार, पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोक रविराज गटकुळ, पोकॉ मिलीद दहीहांडे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोका येवले पोका भराटे, पोकॉ रंदिल, पोकॉ खोटे, पोकॉ/ प्रसाद काटे तसेच सायबर पो ठाणे कडील पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago