करमाळा प्रतिनिधी शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी तुषार जाधव यांची निवड करण्यात आली.वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना राज्य प्रमुख मा राहुल कनाल व उपराज्यप्रमुख मा प्रतिक दादा शर्मा, शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आलीनिवडी नंतर जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे विकास भूमुक आणि लोकाभिमुकक प्रशासन राबत आहे तो विचार संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याची जबाबदारी पाळेल व पक्षाचे काम तन मन धनाने करेल.तसेच या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या असून जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…