Categories: करमाळा

सोगावचे सरपंच विशाल सरडे यांचे सरपंच व सदस्य पद कायम

करमाळा प्रतिनिधी सोगावचे सरपंच विशाल सरडे यांचे सरपंच व सदस्य पद कायम ठेवण्यात आले आहे.शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून करमाळा तालुक्यातील सोगावचे सरपंच विशाल विश्वनाथ सरडे यांना अपात्र करावया मागणीसाठी मनोज दत्तात्रय घनवट यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे ग्रामपंचायत अधिनियम 14 ज 3 खाली अर्ज दाखल केला होता. माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर त्यांचा न्याय निवाडा होऊन सरपंच विशाल सरडे यांचे सरपंच पद व सदस्य पद कायम राहिल्याचे आदेश महसूल विभागाचे विद्यमान उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब यांनी काढले आहेत. सरपंच विशाल सरडे यांच्या बाजूने एडवोकेट पांडुरंग माने यांनी युक्तिवाद केला. सोगाव ग्रामपंचायतचे सरपंच विशाल सरडे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले आहेतसंपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले या निकालामुळे सोगाव गावांमध्ये सरपंच विशाल सरडे यांच्या समर्थक आणि आनंद उत्सव साजरा केला.

saptahikpawanputra

Recent Posts

सरपडोहच्या देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीत ३० सप्टेंबरला मंत्रालयात बैठक – दिग्विजय बागल

करमाळा( प्रतिनिधी )- मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता…

1 day ago

शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन; भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही निधी देण्याची घोषणा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…

3 days ago

कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेच्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड करमाळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब सुरू; पाटील कुटुंबीयांचा उपक्रम स्तुत्य : पालकमंत्री जयकुमार गोरे

करमाळा प्रतिनिधी कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक…

3 days ago

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

4 days ago