Categories: करमाळा

देव देश धर्म याबरोबर सर्वधर्म समभावाचा वसा जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद-पोलीस निरीक्षक रणजीत माने

करमाळा प्रतिनिधी : – देव देश धर्म ऐतिहासिक याबरोबर सर्वधर्म समभावाचा वसा जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांचे कार्य कोतुकास्पद आहे असे करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ‌ रणजीत माने साहेब यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ यांनी गणेशोत्सवानिमित्त आरस म्हणून ऐतिहासिक हिरकणीचे शोर्य देखावा केला असून या देखाव्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या शुभहस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन गुंजकर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, आदिनाथ चे संचालक डॉ. हरिदास केवारे ज्येष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे संचालक डॉ हरिदास केवारे आशपाक सय्यद ,जयंत दळवी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, पत्रकार विशाल घोलप अशोक मुरूमकर, सिद्धार्थ वाघमारे विशाल परदेशी सरपंच भोजराज सुरवसे सरपंच भाऊसाहेब काळे सरपंच धनंजय शिंदे सरपंच दौलत वाघमोडे संचालक वालचंद्र रोडगे उपाध्यक्ष गजानन गावडे फारूख जमादार चेअरमन विलास दळवी विजय दोशी उत्कर्ष गांधी अशोक दोशी पिंटू शेठ कटारिया प्रदीप लुणिया अल्लाउद्दिन शेख अनिल माने हुमरान मुलाणी मान्यवर ‌ प्रतिष्ठित व्यापारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना रणजीत माने साहेब म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ हे खऱ्या अर्थाने सामाजिक धार्मिक तसेच सामाजिक समरसता जपणारे मंडळा असून या मंडळाची ऐतिहासिक परंपरा असून 78 वर्षाची यशस्वी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश मंडळाला डॉल्बी लावू नका अशी सांगावे लागते परंतु छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांनी अद्याप पर्यंत डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्य वाजून मिरवणूक काढली आहे खऱ्या अर्थाने हे मंडळ एक आदर्श मंडळ असून या मंडळाचा आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे रणजीत माने साहेब यांनी सांगितले.: यावेळी मनोगत व्यक्त करताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. गणेशोत्सवा बरोबरच या मंडळाचे वतीने रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर अशा पद्धतीचे समाज उपयोगी उपक्रम राबवत असून या मंडळामध्ये सर्व जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले हे मंडळ एक कुटुंब असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले मिरवणुकीमध्ये सुद्धा पोलिसांना कुठलाही प्रकारचा त्रास न होता आम्ही आमची मिरवणूक पोलीस बंदोबस्त शिवाय यशस्वीपणे काढू शकतो असे आमचे शिस्तप्रिय मंडळ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‌ आदिनाथ कारखान्याचे संचालक ‌ एडवोकेट राहुल सावंत म्हणाले की आमचे आजोबा कैलासवासी अनंतराव सावंत ‌ यांनी स्थापन केलेल्या या मंडळाचे काम ‌ यशस्वीपणे चालू असून कै. सुभाष सावंत ‌ यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत भगवान सावंत, दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याणकारी उपक्रम राबवून ‌ सामाजिक सलोखा जपण्याचे काम आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाबुराव हिरडे सुनील बापू सावंत डॉ.गजानन गुंजकर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी केले प्रास्ताविक सुत्रसंचालन संजय खारगे गुरूजी यांनी केले तर आभार ॲड राहुल सावंत यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago