Categories: Uncategorized

कुंभेज येथे जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे गणेशोत्सवानिमित्त महिला सन्मान व हळदी कुंकू व स्वामी समर्थ १५० मूर्तीचे वितरण समारंभ संपन्न

करमाळा प्रतिनिधी कुंभेज येथे जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे गणेशोत्सवानिमित्त महिला सन्मान व हळदी कुंकू व स्वामी समर्थ १५० मूर्तीचे वितरण समारंभ संपन्न झाले.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर समितीचे विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांच्या सौजन्याने स्वामी समर्थ महाराज यांच्या १५० मूर्ती मंडळास देण्यात आल्या आणि करमाळ्याचे माजी उपसभापती सौ. अर्चनाताई भारतराव शिंदे पाटील यांचे शुभहस्ते उपस्थित महिला भगिनीना वितरण करण्यात आले .

चौकट
————————————
॰ अक्कलकोट स्वामी समर्थांचे 150 मूर्तीचे महिला भगिनीना वितरण असे आहेत जय महाराष्ट्र तरुण गणेश मंडळाचे उपक्रममंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
* कुंभेज परिसरात वृक्षरोपण
*श्रींचे आरतीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना वृक्ष रोप (फळझाड) भेट. वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सायंकाळी आठ ते दहापर्यंत मोबाईल बंदी एकल वापर प्लास्टिक टाळण्यासाठी जनजागृती,सार्वजनिक गणेशोत्सवातील निर्माल्य व पूजेतील साहित्य संकलन करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसंतांचे व राष्ट्रपुरुषांचे विचारांचे प्रबोधनपर फलमंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब साळुंके यांनी सांगितले की रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने सामाजिक विशेष व विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे मा.उपसभापती अर्चनाताई शिंदे पाटील, रेखा शिंदे-साळुंके, स्वातीताई साळूंके, कु. श्वेताताई शिंदे, पोलिस पाटील नम्रता साळुंके, कांचन काळे, प्रतिभा तोरमल, या मान्यवरांसह वर्षा सातव, प्रतिक्षा काळे, रुपाली सातव, बिजल पवळ,उपस्थित होते.
या उपक्रमासाठीअरविंद साळुंखे, रामभाऊ माने, श्रीकांत काळे, रमेश काळे,, ग्रामपंचायतचे सदस्य रणजीत कादगे, पैगंबर पठाण, श्रीकांत काळे, महावीर पवार, गणेश काळे, अण्णासाहेब कादगे, श्रीमंत काटे, अश्रू तोरमल, प्रितम काळे , वृषभ साळुंके बबलू कण्हेरे , विघ्नेश देशमुख, ओंकार गुरव , आदम शेख यांनी परिश्रम घेतलेया कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन रामभाऊ माने यांनी केले तर श्रीकांत काळे यांनी आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago