Categories: करमाळा

करमाळा येथे संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिजन संपन्न*

करमाळा  प्रतिनिधी- करमाळा शहर व तालुक्यातील कैकाडी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते करमाळा येथील केशव विहीर परिसरात करण्यात आले.
या भव्य अशा सांस्कृतिक भावनामुळे कैकाडी समाजासह गोरगरीब घटकांना सामुदायिक कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
या भवनाची मागणी कैकाडी समाजाचे लोकप्रिय नेते व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर (तात्या) जाधव यांनी केली होती.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले की,भाजपचे नेते गणेशभाऊ चिवटे यांनी गोरगरीब समाजासाठी हे सांस्कृतिक भवन मंजूर करून दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी या सांस्कृतिक भवनाची मोठी सोय होणार असून करमाळा शहराच्या वैभवात या सांस्कृतिक भवनामुळे भर पडणार आहे.
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की, करमाळा शहरात आजवर कोणतेही सामुदायिक समाजमंदिर नव्हते , अफसरतात्या जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे आज हे समाजमंदिर उभे राहत आहे. यामुळे गोरगरीब लोकांचे छोटे-मोठे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम कमी खर्चात पार पाडता येणार आहेत.”
या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे,
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे असे चिवटे यांनी सांगितले,

*चौकट*
मी गेली अनेक वर्ष माझे मित्र गणेशभाऊ चिवटे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो त्यांनी त्यांच्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमच्या समाजासाठी तब्बल ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे, त्यामुळे समाजासाठी व शहरातील गोरगरीब जनतेसाठी एक भव्य असे सांस्कृतिक भवन उभा राहत आहे,
आम्ही समाज्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो,
*अफसर जाधव – डबल महाराष्ट्र चॅम्पियन*

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी हे भव्य दिव्य सांस्कृतिक भवन येणाऱ्या काळात समाजासाठी मोठं योगदान ठरणार असून गणेशभाऊ चिवटे व अफसर तात्या जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठ यश आले आहे असे प्रतिपादन केले, सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी केले.
यावेळी भाजपा नेते रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , रामकृष्ण माने, संतोष जाधव, मारुती जाधव, रवी जाधव, धनंजय माने, सचिन माने, आकाश जाधव, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, सरपंच सुभाष हानपुडे, संजय दुरगुळे, सोमनाथ घाडगे, बंडू शिंदे, विष्णू रंदवे, पत्रकार दिनेश मडके, राजु सय्यद, राजश्री खाडे, संगीता नष्टे, चंपावती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago