रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.जयकुमार गोरे यांची दहिवडी येथे जाऊन रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या सिष्टमंडळाने भेट घेतली . निवेदन देवुन या संदर्भात चर्चा करण्यात आली.निवेदनात असे म्हटले आहे की
करमाळा तालुक्यास कुकडी प्रकल्पातून 6.23 टी.एम.सी पाणी मिळणे अपेक्षित असताना एक टी. एम.सी पाणी सुद्धा मिळत नाही त्यामुळे लाभार्थी 45 गावातील सरपंच शेतकरी सदर पाणी नदीद्वारे उजनी धरणात सोडून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेद्वारे उपलब्ध करून देणे बाबत मागणी करीत आहेत
यासाठी विविध आंदोलने निवेदने व विनंती पत्र देऊन वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबाबत जलसंपदा विभागाने सविस्तर अभ्यास करून शासनास अहवाल सादर केलेला आहे या योजनेच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे.तरी आपण जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी व रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समिती करमाळा
यांची संयुक्त बैठक आयोजित करून ही योजना मार्गी लावावी अशी मागणी करण्यात आली.याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊनमंत्री महोदयांनी यासाठी सोलापूर येथे वेळ देऊन सविस्तर माहिती घेण्यासाठी चर्चा करण्याचे मान्य केले . तसेच या योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपण संयुक्त बैठक आयोजित करून ही योजना मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करू
असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले .
यावेळी पोथरे सरपंच अंकुश शिंदे, पिंपळवाडी चे मदन पाटील, कोर्टी मा. उपसरपंच सुभाष अभंग, शिवाजी माने ,बाळासाहेब टकले, अमर काळे, सिद्धार्थ वाघमारे, नरेंद्रसिंह ठाकूर ,भारत शेंडे आदी जण उपस्थित होते.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…