Categories: करमाळा

किंग्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रम गणेशोत्सवानिमित्त १११११ मोदकांचे केले गणेश भक्तांना वाटप

करमाळा प्रतिनिधी किंग्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रमाने साजरा केला असून गणेशोत्सवानिमित्त १११११ मोदकांचे केले गणेश भक्तांना वाटप करण्यात आले.शुक्रवार :दिनांक ५ सप्टेंबर रोजी छत्रपती श्री .शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सायंकाळी ठीक ७ वाजता हा कार्यक्रम पार पडला.
किंग्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा .युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या हस्ते १११११ मोदकांचे गणेश भक्तांना वाटप करण्यात आले. किंग्स फाउंडेशन हे गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आपल्या सदस्यांमार्फत वेगवेगळे समाज उपयोगी कार्य करत असते. कोरोना काळात लोकांना मास्क पुरवण्याचे अत्यंत महत्त्वाचं काम याच फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. किंग्स फाउंडेशन दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते व हे कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पाडले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त मागील दोन वर्षांपूर्वी तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. आजच्या या १११११ मोदक वाटप कार्यक्रमाला किंग्स फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ॲड .नवनाथ राखुंडे, एपीआय गिरिजा मस्के वतसेच किंग ग्रुपचे सदस्य पप्पू राखुंडे, संदीप पवार, ओंकार घोंगडे, विजय जाधव,प्रशांत पवार, अजिंक्य महाजन, भूषण महाजन, शिवम तांगडे, किरण फुटाणे, आयुष राखुंडे, अथर्व चव्हाण ,स्वप्नील झिंजाडे, किरण गेमाड ,प्रणव,तन्मय मोरे ,सुमित धाकपडे, जय खडके उपस्थिती दर्शविली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago