करमाळा प्रतिनिधी युनिटी वेलनेस क्लब पुणे यांच्या वतीने पोथरे येथे बॉडी चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक बाळासाहेब होसिंग यांनी दिली. हे शिबिर रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा सर्व तालुकावासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या शिबिरामध्ये सुप्रीम कोच तानाजी कदम हे मार्गदर्शन करणार असून रोजची दिनचर्या कशी असावी, रोग प्रतिकार क्षमता कशी वाढवावी, दिवसभर उत्साही व एनर्जीटींक कसे राहावे, उंचीनुसार वजनाचे नियंत्रण कसे ठेवावे, आपला आहार कसा असावा, शरीरातील घटकांचे प्रमाण वजन कसे संतुलन ठेवावे, आहार विहार कसा असावा, ऋतुमान वयोमानुसार आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, वयोमानुसार शरीरामध्ये होत जाणारे बदल, वजन, शरीरातील फॅट, व्हिसस्लुफॅट, शरीराचे वय, स्नायूंची स्थिती, पोटावरील फॅट, बी. एम. आय, मेटेबॉलिझम या सर्व गोष्टीवर अचूक मार्गदर्शन करणार आहेत. तरी आनंदी लॉन्स मंगल कार्यालय पोथरे येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…