Categories: करमाळा

करमाळा मतदारसंघातील कुर्डुवाडी आगारास 5 नवीन बस(लालपरी)मंजूर.आमदार नारायण पाटील यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा मतदारसंघातील कुर्डुवाडी आगारामधील बसेसची दुरवस्था झालेली असल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.त्यामुळे कुर्डुवाडी आगारास ३० नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात 5 बसेस(लालपरी)दिल्या होत्या व आज कुर्डुवाडी आगारास पुन्हा 5 नवीन बसेस(लालपरी)मंजूर केल्या असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली.
कुर्डुवाडी डेपोमधील बसेस खराब असल्याने प्रवाशी,शालेय वि‌द्यार्थ्यांची गैरसोय होत असुन कुर्डुवाडी आगाराची स्थिती ही बिकट असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन दिली होती.
कुर्डुवाडी आगाराच्या बऱ्याच बस खराब व नादुरुस्त झालेल्या असून गेल्या वर्षभरामध्ये अनेक बसचा प्रवास चालू असतानाच यांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहेत.तसेच काही बसचे अपघात होऊन प्रवासी जखमी झाले आहेत.कुर्डुवाडी आगारात एस टी गाड्यांची संख्या कमी असून १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या बसेसची संख्या ही जास्त असून त्या मोडकळीत आलेल्या आहेत.खराब बसेस मुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.उक्त बसेस या मार्गावर सतत बंद पडत असल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.
तसेच करमाळा मतदार संघातील कुर्डूवाडी आगार मधील विविध समस्या बाबत बैठक आयोजित करावी अशी मागणी केली आहे.याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन परिवहनमंत्री यांनी दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago