Categories: करमाळा

वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवराज झोळ यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर – 12 सप्टेंबर 2025वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी शांततेत पार पडली. या निवडीत श्री. शिवराज झोळ यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तानाजी बापू झोळ होते. उपसरपंचपदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने, सभागृहातील एकमताने श्री. शिवराज हनुमंत झोळ यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर श्री. झोळ यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.या वेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंचपदी एका तरुण व सक्रिय व्यक्तीची निवड झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून, सर्वत्र शिवराज झोळ यांचे अभिनंदन होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago