Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी-चेअरमन शंभुराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात 15 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संगोबा व पंचक्रोशीतील नागरिकांचे तसेच तालुक्यात इतरत्र ठिकाणी अतिवृष्टी मुळे कांदा, उडीद, मका, तूर, ऊस इ. पिकांचे जे नुकसान झाले आहे. त्यांची सरसकट नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी असे आवाहन कृ.उ.बा. समितीचे संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी प्रशासनाला केले आहे.तसेच अतिवृष्टीमुळे सिनेकाठच्या गावातील लोकांच्या शेतात पुराचे पानी शिरल्यामुळे जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. पुराच्या पाण्यामुळे अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे ते लोकं बाहेर ही पडू शकत नाही अशा लोकांना शासनाने अन्न पुरवण्याची व्यवस्था करावी असेही आवाहन शंभूराजे यांनी केले आहे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने आपण सर्वांनी मिळून जे शक्य होईल ते सहकार्य या पूरग्रस्त बाधित शेकऱ्यांना करावे. मी ही जेवढी मदत होईल तेवढी मदत वेळोवेळी करत राहणार आहे.वेळोवेळी प्रशासनाने अलर्ट राहून नदीकाठच्या गावातील लोकांना आर्थिक आधार देऊन अन्न पुरवण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशाही सूचना शंभूराजे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासन संगोबा पूल येथे येऊन बॅरिगेट्स लावून जे उत्साही तरुण पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतात किंवा पाण्यात शिरण्याचा प्रयत्न करतात त्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून कुठलाही अनर्थ घडू नये.तरी सिनेकाढच्या ग्रामस्थांना कुठलीही अडचण भासल्यास मला (शंभूराजे दादा जगताप) सपंर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सपंर्क – मोबाईल नं – 917058239394

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago