करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदार संघातील बांधकाम कामगारांची नोंदणी माजी आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय यांच्या वतीने मोफत करून देण्यात आलेली होती. सदर बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंचे वाटप काल दिनांक 15 रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .यावेळी अर्बन बँकेचे माजी चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, रामभाऊ ढाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे, शिवराज जगताप, तात्यामामा सरडे , सुजिततात्या बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 139 लाभार्थींना गृहपयोगी वस्तूंच्या 30 भांड्यांचे वाटप करण्यात आले.
चौकट –
सामाजिक उपक्रम सुरूच राहणार – सुजित बागल
यावेळी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा संपर्क कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आमदार आपल्या दारी …शासकीय योजना पोहोचतील घरोघरी यासारखे उपक्रम गेल्या पंचवार्षिकमध्ये राबविण्यात आल्यामुळे त्याचा फायदा अनेक सर्वसामान्य मतदारांना झाला .सध्या संपर्क कार्यालयाकडून 2200 बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असून बांधकाम कामगारांना मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ते लाभ त्यांना मिळवून देऊ.
हे होणार बांधकाम कामगारांना फायदे –
मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दोन लाखांपर्यंत आरोग्य उपचारांमध्ये सूट, मुलीच्या विवाहासाठी अनुदान ,घरकुल आवास योजनेसाठी अनुदान, मृत्यू नंतर वारसाला आर्थिक मोबदला मिळणार.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…