Categories: करमाळा

सिना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांचे निवेदन*”

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सिना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य भैय्या पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. करमाळा तालुक्यात आलेल्या पुरामुळे तरटगाव,बिटरगाव,पोटेगाव, आळजापुर  बाळेवाडी खडकी येथील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून यासंबंधी पाहणी दौरा करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळा तालुक्यातील या गावांना बांधावर भेटी देण्यास आले होते यावेळी अजिंक्य पाटील यांनी यासंबंधी तसेच विविध मागणींचे निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये तरडगाव बिटरगाव रस्ता खराब झाल्याने त्वरित दुरुस्त करावा पुरामुळे शेतकऱ्याचे पिकाच्या नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तरटगाव संगोबा को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे तरटगाव बंधाऱ्यातून नवेदार टाकल्यावर आळजापूर बिटरगाव शेतामध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान होते व संपूर्ण पाणी मिळत नाही त्यामुळे याकरिता मागच्या बाजूस भिंत बांधण्यात यावी पोटेगाव बंधारा दुरुस्त करण्यात यावा मंगी तलावातील पाणी सोडण्यासाठी बिटरगाव येथील साईपणचे काम सुरू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारून तात्काळ याची दखल घेऊन कार्यवाही करतो असे आश्वासन दिले होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे भाजपा नेते कन्हैयालाल देवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल राष्ट्रवादी उपाध्यक्ष अशपाक जमादार खडकीचे दादा जाधव अशोक मुरूमकर जातेगाव चे युवा नेते तुषार शिंदे पत्रकार जयंत दळवी आदी जण उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago