Categories: करमाळा

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बार्शी येथे 21 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळयाचे आयोजन- मुकुंद साळुंखे सर

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचेवतीने आदर्श शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी ‌ दुपारी दीड वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी दिली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल असून ‌ धाराशिव चे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजेंद्र राऊत साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ वर्षाताई ठोंबरे, माध्यमिक रावसाहेब मिरगणे,शिक्षण अधिकारी सचिन जगताप, लेखाधिकारी श्रीकांत देवडीकर, वेतन अधीक्षक दीपक मुंड,उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जमाले . जिल्हाध्यक्ष टीडीएफ मोहन गायकवाड,तुकाराम मेटकरी मंगळवेढा, टी डी एफ मा.अध्यक्ष हरिदास जाजनुरे, सचिव नीलकंठ लिंगे,माजीसचिव.श्री.ए.जे.पवार,राज्य प्रतिनिधी टी.डी एफ मुकुंद साळुंके सर, जिल्हा उपाध्यक्ष टी.डीएफ संजय सोनवणे, मा. सचिव सोलापूर माध्यमिक शिक्षक संघाचे.ए.बी.शेख, जिल्हाध्यक्ष सचिन झाडबुके उपाध्यक्ष विजय वाघमोडे, उपाध्यक्ष सचिन काशीद,सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव संभाजी वागज, निमंत्रक रोहिदास साळुंखे,सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे राजाराम शिवशरण, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम हानपुडे, उपाध्यक्ष गिरीष गायकवाड, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव विष्णु दगडे निमंत्रक यशवंत तिवारी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाचे प्रसिद्धीप्रमुख अर्जुन बनसोडे, सल्लागार हनुमंत जोडबोटे,गणेश यादव ,रविंद्र मठपती ,.सुधीर खाडे,संयोजक मंगेश सोनवणे सुहास शिंदे अमोल माडेकर, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ महिला प्रतिनिधी अर्चना जमाले ,प्रविणा झाडबुके कार्याध्यक्ष भारत इंगवले. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव गणेश माडेकर, कोषाध्यक्ष रमेश येणगुरे प्रसिद्धीप्रमुख.प्रविण शिवशरण नागेश जमदाडे संतोष साळुंके यांच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ‌ सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन झाडबुके यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago