Categories: करमाळा

श्री जगदंबा कमलादेवी नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारीची बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी-  श्री जगदंबा कमलादेवी नवरात्र उत्सव निमित्त सालाबाद मक्तामिटिंग व शांतता कमिटी बैठक  तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली  झाली असून सकाळी ११ च्या सुमारास पार पडली असून जयदिप पुजारी, रामदास सोरटे,भारत सोरटे, यांनी मक्ता घेतला आहे. दि २२ सप्टेंबर २०२५ ते भाद्रपद वैद्य अमावस्या पर्यंत एका वर्षाचा मक्ता दिला आहे.या नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनाची महापुजा माननीय तहसीलदार शिल्पाताई सुधीर घोंगडे व श्री सुधीर मल्लिकार्जुन घोंगडे यांच्या हस्ते घटस्थापना अष्टमी होम पुजा होणार असून उत्सव काळात मंदिर समितीकडून भक्तांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही भक्तांच्या दर्शनासाठी उड्डाण पूल स्टील रेलिंग ची रांग त्याच बरोबर गोपुरे तीन दिपमाळी यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई तसेच माही डेकोरेशन मराठा मंदीर डोकोरेशन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आकर्षक डिझाईन चे डेकोरेशन करण्यात येणार आहे. तसेच पारंपारिक वाद्य बॅण्ड पथक देखील सांगण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे.
माननीय करमाळा डिवाय एस पी अंजना कृष्णा पिआय रणजित माने यांची शांतता कमिटी बैठक पार पडली.यावेळी उपस्थित श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे पद सिध्द तहसीलदार सौ शिल्पताई ठोकडे, अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, डॉ रोहन पाटील, सुशील राठोड, ॲड शिरिषकुमार लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर, करमाळा तसेच श्री देवीचामाळ ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी मानकरी, खांदेकरी व सर्व भक्तगण उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago