Categories: Uncategorized

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचा ‌ जीवन गौरव पुरस्कार मुकुंद साळुंखे सर यांना प्रदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून नामदेवराव जगताप विद्यालय झरे येथे तीस वर्ष उत्कूष्ठ सेवा केल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघटनेचे ‌ पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांना बार्शीचे लोकप्रिय आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षक संघटनेचा ‌जीवन गौरव पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांचा ‌ कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येते मुकुंद साळुंखे सर त्यांच्या धर्मपत्नी सौ राणी राऊत ,चिरंजीव शुभनीत यांच्यासह सहकुटुंब हा सन्मान स्वीकारला. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ‌ म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण मोर्चे आंदोलन विविध मार्गाने शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे .यावेळी शिक्षण निरीक्षक पुणे रावसो मिरगणे जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत साहेब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मुकुंद साळुंके सरांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ‌ करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे ,सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष ‌ संजय सोनवणे सर, जिल्हा उपाध्यक्ष ‌उत्तम हनपुडे, तालुकाध्यक्ष प्रताप बरडे, किरण किरवे तालुकाध्यक्ष टी.डीएफ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे विभागातून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago