Categories: करमाळा

नारायण आबा व जयवंत भाऊ एकत्र राहिले तर तालुक्यातील भगवा कुणी रोखू शकत नाही- गृहराज्यमंत्री योगेश कदम

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील लोकप्रिय आमदार नारायण आबा पाटील हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले की त्यांच्या हृदयात एकनाथ शिंदे आहेत आता जयवंतराव जगताप त्यांच्यासोबत असल्यामुळे शिवसेनेचा भगवा करमाळा तालुक्यात डोमाने फडकेल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीसाठी आमदार नारायण पाटील,
नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, कामगार सेना जिल्हाप्रमुख अमोल जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, धर्मवीर वाहतूक सेना जिल्हाप्रमुख अण्णासाहेब घाडगे,
ओबीसी तालुकाप्रमुख अंकुशराव जाधव, तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, युवा नेते शंभूराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायण जगताप, माजी नगराध्यक्ष अमोद संचिती यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघातील अनेक कामात मला मदत करून ताकद देण्याचे काम केले आहे त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे
पक्ष कुठला जरी असला तरी जनतेच्या प्रश्नासाठी मदत करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मला अभिमान वाटणारी आहे योगेश कदम सारख्या तरुण नेतृत्वामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पाठिंब्याने आशीर्वादाने मी आमदार झालो आहे तालुक्यातील जनतेने मला आशीर्वाद दिला आहे आदिनाथ कारखान्याला सुद्धा यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे

यावर बोलताना नामदार योगेश कदम म्हणाले तांत्रिकदृष्ट्या नारायण आबा दुसऱ्या पक्षात असले तरी त्यांच्या हृदयात शिवसेना आहे शिवसेना नेते रामदास भाई कदम सोलापूर जिल्ह्याचे संपर्क नेते असताना संपूर्ण सोलापूर जिल्हा भगवा होता आता पुन्हा एकदा सर्वांना बरोबर घेऊन संपूर्ण जिल्हा भगवा करायचा आहे करमाळा तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊ असे आश्वासन दिले

यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे बोलले की आता करमाळा तालुक्यात आमदार नारायण आबा , माजी आमदार जयवंतराव जगताप, जिल्हाप्रमुख महेश चिवटे सर्व शिवसेना एकत्रित काम करत असल्यामुळे तालुक्याचा विकासही होईल आणि तालुक्यातील सर्व निवडणुका शिवसेना जिंकेल असा विश्वास व्यक्त केला करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे करमाळा येथे चांगले काम सुरू आहे या पद्धतीने सांगोला दक्षिण सोलापूर अक्कलकोट सोलापूर शहर मोहोळ या या भागात शिवसेनेची लाट येत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना घवघवीत यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला

करमाळा तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी स्वतः पाण्यात जाऊन नामदार योगेश कदम यांनी केली ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे सरसकट पंचनामे करून एकही नुकसान झालेला शेतकरी भरपाई पासून वंचित राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्या अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago