Categories: करमाळा

वकिलांनी पक्षकारास केस जिंकण्यासाठी प्रयत्नाची हमी द्यावी -ॲड अनिकेत निकम

करमाळा प्रतिनिधी वकिलांनी पक्षकारास केस जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी द्यावी आणि त्यांच्याशी प्रामाणिक रहावे असे मत आज दिनांक 20/9/2025 रोजी करमाळा शहरात कोर्टा समोर मुंबई उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करणारे ॲड भाग्यश्री मांगले शिंगाडे आणि ॲड अमर शिंगाडे यांच्या नवीन ऑफीसचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील श्री ॲड अनिकेत निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्यावेळी त्यांनी पक्षकार आणि वकील यांच्या व्यावसायिक नात्यातील संबंधां विषयी व्यक्त केले.

ॲड अनिकेत निकम पुढे म्हणाले की ॲड भाग्यश्री मांगले या उच्च न्यायालयात आपल्या पक्षकाराची अतिशय अभ्यासपूर्ण व प्रामाणिक पणे बाजू मांडतात. असे म्हणून त्यांनी ॲड भाग्यश्री मांगले यांचे कौतुक केले व ॲड अमर हे पक्षकाराना न्याय मिळवा म्हणून कसोशीने प्रयत्न करत आहेत असे सांगितले आणि वकील व्यवसायासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी विद्या विकास संस्थेचे सचिव श्री विलासरावजी घुमरे सर म्हणाले की माझे व वकिलांचे अनेक वर्षांपासूनचे जूने संबंध आहेत आणि करमाळा तालुक्यातील वकील हे प्रामाणिक व सचोटीने व्यवसाय करतात असे म्हणून मांगले व शिंगाडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असून आमची मुलगी आणि जावई असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ॲड अनिकेत निकम साहेब यांचा करमाळ्याची प्रसिद्ध देवी कमलाभवाणी मातेची फोटोफ्रेम, पुष्पबुके, शाल, फेटा देऊन तसेच उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच नवीन ऑफीसचे उद्घाटन झाल्यानंतर विद्या विकास संस्थेचे महाविद्यालय येथे विद्यार्थ्यासाठी ॲड अनिकेत निकम साहेब यांचे कायदेविषय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सदर व्याख्यानात कायदे विषयक माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेऊन सर्वागीण शिक्षण घ्यावे आणि शिक्षित होण्याबरोबर संस्कारित होऊन या देशाचे सुद्य व सुजान नागरिक व्हावे आणि समाजाची सेवा करावी असे आवाहन केले त्याचवेळी त्यांनी संस्थेच्या कामाचे भरभरून कौतुक केले, ॲड निकम साहेब यांचा महाविद्यालयाने शाल, फेटा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे. तत्पूर्वी त्यांनी सकाळी करमाळा शहरातील कमलाभवानी मातेचे दर्शन घेऊन उद्घाटन कार्यक्रम स्थळी आले होते.

उद्घाटन सोहळ्यात यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील सिनिअर वकील श्री ॲड ई. ए. शशी, ॲड रेखा मुसळे, तसेच मकाई कारखान्याचे माजी चेअरमन श्री दिग्विजय बागल, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रश्मी दीदी बागल, बार्शी येथील ॲड निखिल पाटील अणि प्रमुख पाहुणे म्हणून ॲड राजेश दिवाण, ॲड कमलाकर वीर, ॲड जयदीप देवकर, ॲड बळवंत राऊत, ॲड सुहास मोरे, ॲड नानासो शिंदे, करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड रामभाऊ निळ, उपाध्यक्ष ॲड विनोद चौधरी, सचिव ॲड अलिम पठाण, माजी पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत, आणि करमाळा बार असोसिएशनचे सर्व पुरुष आणि महिला ॲड सदस्य, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, मांगले शिंगाडे यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, परिसरातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

महिला आरक्षण विधेयकास विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ करमाळ्यात जनआक्रोश आंदोलन .

  करमाळा. प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची २०२९ पासून अंमलबजावणी करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला…

1 day ago

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंतीनिमित्त एक मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे…

3 days ago

दहिगावचे पाणी पेटले… २ दिवसांत पाणी सोडा…अन्यथा २९ तारखेला ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा…

4 days ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…

5 days ago

सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी संजयमामांना द्यावी : विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…

5 days ago