Categories: करमाळा

अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट २४ संप्टेंबर रोजी करमाळा दौऱ्यावर : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बुधवार २४ सप्टेंबर रोजी करमाळा दौऱ्यावर येत असून तालुक्यातील अतिवृष्टीने व पूरस्थितीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .याविषयी अधिक माहिती देताना माजी आमदार जगताप यांनी सांगितले की,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट अतिवृष्टीने व पूरस्थिती निर्माण झालेल्या संगोबा,पोथरे, बिटरगाव , आवाटी . . . आदी भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत .तसेच करमाळा शहरांमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन व त्यानंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये चालू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन , लोकार्पण व भव्य शेतकरी मेळावा मार्केट यार्ड मधील भाजी मंडई येथील रयत भवन मध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू ) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नारायण (आबा ) पाटील , उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे ,जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीतआयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार जगताप यांनी दिली .सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,माजी नगराध्यक्ष वैभव आबा जगताप,जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांचे सह शिवसेना व जगताप गटाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .मार्केट यार्ड मधील शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीच्या उपसभापती सौ शैलजा मेहेर यांनी केली आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

6 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago