Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड च्या वतीने करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे साहेब यांना देण्यात आले.करमाळा तालुक्यातील ढगफूटीमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडास आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून करमाळा तालुक्यातील राहिलेल्या सर्व गावाचे त्वरीत पंचनामे करून व समक्ष शेतकऱ्यांच्या बंधावर जाऊन सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी .अशी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली .यावेळी सुहास पोळ (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा),नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष),बाळासाहेब घाडगे (रयत क्रांति तालुकाध्यक्ष करमाळा) ,अतुल निर्मळ(शहराध्यक्ष जेऊर),गणेश कुकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक),सोमनाथ जाधव , हेमंत शिंदे , अजित उपाधे , आदिनाथ माने , पांडुरंग घाडगे , अनिल कागदे व शेतकरी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

1 hour ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago