Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दौरा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरणार-भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दौरा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरणार असे मत करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करमाळा मतदारसंघातील कोर्टी व संगोबा येथे आज बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी आमदार नारायण आबा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे, प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.करमाळा तालुक्यातील कोर्टी ‌ संगोबा येथे अतिवृष्टीमुळे ‌ पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ‌ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याचा संसार ‌ उघड्यावर पडल्याने ‌ त्यांचे जीवन अस्थिर झाल्याने शेतकऱ्यांना मायेची सावली देऊन त्यांना सांत्वन करून सर्वतोपरी मदतीचा हात देऊन ‌ त्यांचे जीवन सुखी संपन्न करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना भेट घेऊन त्यांच्या आढावाचा दौरा संजीवनी देणारा ठरला आहे करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‌ राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी ‌ करमाळा तालुक्यातील कोटी व संगोबा येथील पूर परिस्थितीची माहिती देऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्याची भरपाई ‌ शासनाने सरसकट द्यावी ‌. आसमानी संकट कोसळलेल्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर शासनाने दया दाखवून करमाळा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी ‌ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.करमाळा तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार,,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, तालुका प्रवक्ते ॲड अजित विघ्ने, डॉ .गोरख गुळवे, नितीन राजेभोसले, सुजित बागल,उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप, करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, सोलापूर जिल्हा लेबर सोसायटी संचालक मानसिंग खंडागळे, अमोल फरतडे, अभिजीत सरडे, तुषार शिंदे सुरज ढेरे,बापु तांबे,यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दौरा शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी दिलासा देणारा ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

8 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago