Categories: करमाळा

अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी इतर वेळेचे आकडेवारीचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य अशी नुकसान भरपाई तातडीने द्यावी -दिग्विजय बागल

करमाळा (प्रतिनिधी)- अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी इतर वेळेचे आकडेवारीचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य अशी नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुंगशी तालुका माढा येथे पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलताना मागणी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी शासनाच्या वतीने घेण्यात येईल असे यावेळी सांगितले.
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले असून शेतातील पिकासह काही ठिकाणी शेतीमधील माती वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशावेळी इतर भरपाईचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून झालेल्या नुकसानीची योग्य अशी भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी बागल यांनी उपमुख्यमंत्र्यांबरोबर मुंगशी या ठिकाणी पाहणी केली उपमुख्यमंत्री या परिसरातून गेल्यानंतर परिसरात नुकसान झालेल्या शिंगेवाडी गावांमध्येही जाऊन नुकसानीची पाहणी करत त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला यावेळी अनेक शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले त्यांनी आपल्या व्यथा बागल यांच्यासमोर मांडल्या सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आपण याबाबतीत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्यासोबत श्री.मकाईचे संचालक सतीश निळ भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ यांच्यासह या भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago