Categories: करमाळा

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना रोटरी गाइडिंग लाईट पुरस्कार प्रदान


करमाळा प्रतिनिधी: शिवस्मारक सोलापूर येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर हर्मोनी यांच्या वतीने सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोटरी गाइडिंग लाईट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक आर्ट ऑफ लिविंग च्या शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. करमाळा तालुक्यातून नरारे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत विना मोबदला आरोग्य विषयक मार्गदर्शन, योग प्रशिक्षण, ध्यानधारणा, देशाविषयी प्रेम आणि जनजागृती तसेच या धकाधकीच्या युगात जनतेचे आरोग्य निरोगी रहावे व शांतता लाभावी यासाठी सातत्याने कार्य करणे इत्यादीसाठी मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूरचे डीन डॉ रित्विक जयकार, प्रोफेसर डॉ नितीन भोगे, असिस्टंट गव्हर्नर आर आय डी मा सचिन चौधरी तसेच सोलापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष भूमेश यंगदूल, सचिव महेश जिंदम हे उपस्थित होते. हा पुरस्कार प्राचार्य नरारे यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago